‘स्वराज्य संघटना कोकण’ने सामाजिक उपक्रमातून दिला स्त्री सक्षमीकरणाचा संदेश.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मार्च १०, २०२३.
तालुक्यातील कडवई येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. अविनाश गुरव यांच्या स्वराज्य संघटना कोकण या संस्थेने महिला दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला. “समाजातील अन्य माता भगिनींनी स्वतः सक्षम व्हावे आणि पुढे समाजाला सशक्त करावे अशी भूमिका घेत महिलांना उत्तेजना देण्यासाठी हा उपक्रम राबवला.” अशी माहिती स्वराज्य संघटना कोकणचे संस्थापक अध्यक्ष श्री. गुरव यांनी दिली.

यावेळी कडवई गावामधील आशा सेविका, विविध समस्या सोडवण्यासाठी अग्रणी असणार्या भाजपा संगमेश्वर, महिला आघाडी अध्यक्षा सौ. कोमल रहाटे, करजुवे गावातील संध्या बने, भाजयुमो संगमेश्वरच्या युवती अध्यक्षा कु. धनश्री वेल्हाळ यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. अविनाश गुरव यांच्यासोबत स्वराज्य संघटना कोकण क्रिडा अध्यक्ष श्री. बावा कांबळे, सदस्य श्री. उत्तेश धामनाक, श्री. कुंडलिक पाटील, श्री. कमलेश आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
