
रत्नागिरी :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु असून, इच्छुक उमेदवारांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत.
प्रवेश प्रक्रिया कामकाज सुट्टीच्या दिवशी चालू असते. प्रवेशाच्या अधिक माहितीकरिता सी.आर. शिंदे, गटनिदेशक (मो.नं.९९६७७७५३१७) पी.जी. कांबळे, गटनिदेशक (मो.नं.९४२३८७६८८३) एस. जे. पावसकर, शिल्पनिदेशक (मो.नं. ८४२१९७९६६३) यांना संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यानंतर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रिया २०२५ च्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची परिपूर्ण माहिती देण्यात येईल. त्याअनुषंगाने इयत्ता दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घ्यावेत.