
दीपक भोसले/संगमेश्वर- भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या महुवा महोत्सव २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व श्री देवी वाघजाई सांस्कृतिक कलामंच, तेर्ये संगमेश्वर हे करणार आहेत. यामध्ये त्यांनी सादर केलेले पारंपरिक कोळी नृत्य हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
कलामंचाचे पदाधिकारी —..
सतीश पवार, उमेश बाईत, अजित मोहिते, उदय भुरवने आणि सुभाष पवार — यांनी या सादरीकरणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. पारंपरिक वारसा जपण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
हा महोत्सव केवळ सांस्कृतिक एकोपा वाढवणारा नाही तर महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे दर्शन संपूर्ण देशाला घडवणारा ठरणार आहे. कोकणातील पारंपरिक कोळी नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, लोकजीवन आणि सांस्कृतिक ओळख भोपाळमध्ये झळकणार आहे.