शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न…

Spread the love

मुंबई | 3 जून 2025- प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील’, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये नुकतीच एका जाहीर कार्यक्रमात केली. माजी सैनिक, क्रिडा शिक्षक, एनसीसी व स्काऊट गाईडचे शिक्षक विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील, असे भुसे म्हणाले.

शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना नुकतेच सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना आढळून आल्याचे या शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रही शिक्षणात आमूलाग्र बदल करीत असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून ते दिसून येईल. त्यानुसार ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

पुढे ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.’ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार असून, त्यासाठी हेल्थ कार्ड तयार केले जाणार असल्याचे व तपासणीत आजाराचे निदान झाल्यास, संबंधित विद्यार्थ्याला उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. याचसोबत विद्यार्थ्यांच्या सहलीचे स्वरूप बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या सहलीदरम्यान बांधावर, बँकेत, रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातील व त्यांना व्यवहार ज्ञान दिले जाईल. तसेच, गड-किल्ल्यांवर नेऊन, गौरवशाली इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल, असेही ते म्हणाले.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये घोषणा केली की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी लवकरच सैनिकी शिक्षण सुरू करण्यात येईल. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना रुजवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण व्यवस्थेत बदल करणार असून, आरोग्य तपासणीसाठी हेल्थ कार्ड देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page