
संगमेश्वर प्रतिनिधी- कोकणामध्ये पावसाळी चढणीचे मासे पकडण्याची लगबग चालू झाली आहे . चढणीचे मासे पकडणे हे पारंपारिक पद्धतीने सर चालू आहे. त्यासाठी लोक ओढांवरती बांधणी करतात. पावसाच्या सरी बरसताच चढणीचे मासे पकडण्यासाठी तरुणांची लगबग सुरु असते. अधिवास वगैरे शब्द न वापरता जीवनशैली म्हणण्याच मुख्य कारणं म्हणजे इथली माणसं प्राणी पक्षी आणि सर्व घटकांचे निर्माण झालेले सहजीवन.शेती पाणी आणि खाद्यविषयक अनेक गरजा लीलया भागवणारे सडे पावसाच्या सुरुवातीच्या काळात अक्षरशः माणसांनी भरलेले दिसतात याची अनेक कारणे आहेत. नदी नाले शेतीमध्ये मासे पकडण्यासाठी तरुणांची धावपळ पाहवयास मिळतेय.
बांध्याचे हे मासे खायला देखील खूप रुचकर!
शेतीची कामे स्वच्छ पाणी भारंगी टाकळा फोडशी पायरी सारख्या रानभाज्या मिळवण्यासाठी लोकांची सड्यावर झुंबड उडते रात्री खेकडे आणि मासे पकडण्यासाठी सुध्दा अनेक लोक सड्यावर येतात.
या प्रकारच्या पारंपारिक मासेमारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वर्षांनूवर्षे वापरात आहेत.एक पद्धत म्हणजे बांधन पोटात अंडी असणारे मासे संत गतीने पाण्यात डोहात अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या उलट प्रवाहात वरच्या दिशेने प्रवास करतात.यांनाच मळ्याचे मासे अशा नावाने ओळखले जाते.रंगाने काळे असणारे, देखणे दिसणारे सरळ नेटक्या बांध्याचे हे मासे खायला देखील खूप रुचकर लागतात.
हे मासे खूप स्वच्छ असल्याने वेगवेगळ्या पध्दतीने पकडले जातात.मोठ्या पावसात मात्र बहुतेक सर्व बांधणी वाहून जातात.बांधणात पकडलेले मासे विकत घेण्यासाठी खूप गर्दी होते.पहिल्या पावसातील हे मासे खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते.