
A1 दूध – विदेशी वंशाच्या काऊ संबोधल्या जाणारया ,जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश यांचे तसेच यांपासूुन तयार केलेल्या संकरीत गायी यांचे दूध हे A1 प्रकारचे असते.या प्राण्यांच्या पाठीला वशिंड(Hump) नसते. खरे तर या प्राण्यांना गैरसमजुतीने cow चे भाषांतर गाय असे केल्यामुळे गाय म्हणतात, पण ते चुकीचे आहे. असो, हे दूध देणारे वेगळे प्राणी आहेत.
A2 दूध – भारतीय वंशाच्या देशी गायींचे दूध हे A2 प्रकारचे असते. या मूळ भारतातील गायी असून त्यांच्या पाठीला वशिंड Hump असते. या दुधातील प्रथीन हे A2 बीटा केसीन प्रकारचे असल्याने या दुधास A2 दूध असे म्हणतात. यामधे प्रोलाइन (proline) नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक अमिनो आम्ल असते.
A1 दुधाचे घातक परिणाम – या प्रकारच्या दुधातील प्रथीन हे A1 बीटा केसीन प्रकारचे असते.म्हणून या दुधास A1 दुध असे म्हणतात. या दुधातील या प्रथीनामधे हिस्टीडीन ( Histidine ) नावाचे घातक अमिनो आम्ल असते. जेव्हा हे दूध प्यायले जाते त्यावेळी लहान आतड्यामधे त्याचे पचन होताना हिस्टीडीन विभक्त ( split ) होते व त्यापासून बी सी एम 7 ( BCM 7 – Beta Caso Morphine 7 ) हे अमली पदार्थांच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते. हे BCM 7 थेट स्वादुपिंडावर( pancreas ) हल्ला करुन तेथील इनसुलीनची ( Insulin ) निर्मिती पूर्ण बंद पाडते.
आपणा सर्वाना माहीत आहे की इनसुलीन हे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते. ते कमी झाल्यावर मधुमेह हा रोग होतो. आणि तसेही आता मधुमेही रुग्ण घरोघरी झाल्यामुळे इनसुलीन हा शब्द प्रत्येकाच्या तोंडी असतोच. आता विचार करा A1 दुधातील BCM 7 मुळे जर इनसुलीन ची निर्मिती बंद पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील ते !!!
यामुळे पहिला परिणाम होतो तो म्हणजे अशा व्यक्तीला मधुमेह (Diabetis ) हा रोग होतो. पण एवढ्यावरच हे संकट थांबत नाही, कारण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असल्यामुळे त्यांचे कार्य संयुक्तपणे चालते. या दुधामुळे ह्रदयरोग ,ऑटीझम (स्वमग्नता) स्किझोफ्रेनिया, कॅन्सर, किडनीचे रोग, स्रियांमधील एंडोमेट्रियॉसिस – यामुळे गर्भाशयाच्या अस्तराला सुज येऊन स्त्रियांमधे वांझपणा येतो डोळ्यांची दृष्टी कमी होणे, पुरुषांमधील नपुंसकत्व इत्यादी एकुण 80 प्रकारचे रोग माणसाला होतात. असे न्युझीलंडमधे झालेल्या सरकारी संशोधनावरुन सिध्द झाले आहे.
न्युझीलंडमधे लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते.त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती 1993 मधे नेमली होती. या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषण ( biochemical analysis ) केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे या सर्व रोगाचे कारण म्हणजे जर्सी, होल्स्टेन फ्रीजीयन, रेड डॅनिश या काऊ चे दुध हे आहे. या संशोधनानंतर या विषयावर परत 97 वेळा विविध तज्ज्ञ्यांनी अभ्यास केला. सर्वांचा निष्कर्ष सारखाच आहे. भारतीयांचे डोळे खाडकन उघडावे अशी घटना आहे.
विचार करा आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींचा अभ्यास किती सखोल होता ते. जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्षे लागली की देशी गायीचे दुध तूप गोमूत्र मानवी आरोग्यासाठी वरदान आहे हे हजारो वर्षापुर्वीच आपल्या आयुर्वेदात सांगितलं आहे.
मित्रांनो , आपल्या घरी विकत घेतले जाणारे दूध खऱ्या देशी गायीचे आहे की त्या नावाखाली जर्सीचे दूध आहे हे तपासा, खात्री करुन आपले व कुटुंबाचे आरोग्य जपा…