
*श्रीकृष्ण खातू / धामणी-* संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथे दि.२८मे २०२५ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास काही वेळासाठी वादळ व पाऊस झाला. वादळाचा वेग व पाऊसमान जोरात असल्याने कळंबुशीतील शेवट करंडा या वाडीतील शरद बाळकृष्ण चव्हाण यांच्या राहत्या घरावर फणसाचे मोठे झाड पडले.व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.




या वेळी शरद चव्हाण यांच्या घरी लहान मुलांसह कांही माणसे होती. परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु घराच्या छप्पराचे आर्थिक दृष्ट्या मात्र खूपच नुकसान झाले.पावसाळ्याचे दिवस सुरू होऊन आचानकपणे ओढवलेल्या अशा प्रसंगामुळे शरद चव्हाण कुटुंबीय घाबरून गेले आहे.
सदरचे वृत्त कळताच सरपंच सचिन चव्हाण,गावातील ग्रामस्थ, हितचिंतक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कुटुंबीयांना धीर दिला. व पंचयादी करण्यासाठी संबधीत यंत्रणेला पाचारण केले. नुकसान झालेल्या वस्तूस्थितीची पंचयादी करण्यात आली. यामध्ये, कौले,पत्रे,लोखंडी एंगल, चॅनल,असा अंदाजे खर्च तीस/बत्तीस हजार रूपये अपेक्षित असून हा मदत निधी त्वरीत मिळाल्यास दिलासा मिळेल.