
शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात..उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, 50 लाखांचं सोनं, मोठं घबाड; खिरोळकरकडं काय काय सापडलं? तक्रारदाराकडे मागणी केलेल्या 18 पैकी 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला रंगेहात ताब्यात घेतले.
संभाजीनगर : लाचखोर अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जा असून छत्रपती संभाजीनगरच्या (Sambhajinagar) निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबी पथकाने अटक केली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल 41 लाखांची मागणी केली होती. यापूर्वी या प्रकरणात 23 लाख रुपये त्यांची घरीही पोहोचले आहेत. मात्र, आणखी 18 लाख रुपयांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती. अखेर पाण्यासारखं पैसे मागणाऱ्या या लाचखोर (Bribe) अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून लाचखोर विनोद खिरोळकरला अटक केली. त्यानंतर, त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता मोठं घबाड पोलिसांना सापडलं आहे. त्यामध्ये, तब्बल 50 लाख रुपयांचे सोनं आहे. 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोनं एसीबीने जप्त केलं आहे.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी धाड टाकून लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली. तक्रारदाराकडे मागणी केलेल्या 18 पैकी 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करायची होती. आणि याच करिता निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यांनी संबंधिताकडे सदरील काम करून देण्यासाठी 41 लाख रुपये मागितले होते. त्यातील 23 लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते. मात्र, तरीही 18 लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली. अव्वल कारकुन दिलीप त्रिभुवन मार्फत ही लाच घेण्यात येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यासह, एसीबीने लाचखोर खिरोळकरच्या घरी धाड टाकून मोठा ऐवज आणि रोकड जप्त केली आहे.
59 तोळे सोनं, 13 लाख कॅश
एसीबीने खिरोळकर यांच्या घरातून तब्बल 13 लाख 06 हजार 380 रुपयांची रोकड, 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत अंदाजे 50 लाख 99 हजार 583 रुपये आहे. तसेच, 3 किलो 553 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ज्याची किंमत 3 लाख 39 हजार 345 रुपये एवढी आहे. मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना नेमकं काय-काय सापडलं?…
1) रोख रक्कम-13,06,380/-
2) सोन्याचे दागिने – 589 ग्रॅम किंमत अंदाजे, 50,99,583/-
3) चांदीचे दागिने- 3 किलो 553 ग्रॅम किंमत 3,39,345/-
मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण किंमत- 67,45,308/- रुपये मिळून आले आहेत.