
चिपळूण- आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा एक भाग म्हणून एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ची टीम क्र. 5Q आज सकाळी चिपळूण येथे दाखल झाली आहे.
या टीममध्ये एक कमांडर, एक सब ऑर्डिनेट ऑफिसर आणि 23 हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल यांचा समावेश असून एकूण 25 जवान या मोहिमेत सहभागी आहेत. टीमचे नेतृत्व ASI सतीश देसाई करत असून त्यांच्याशी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल : 8080605371 / 8275359729 ही टीम आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये मदत आणि बचावकार्य करण्यासाठी सज्ज असून स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून काम करणार आहे.