
पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी कन्हेरी काटेवाडी येथील कॅनॉल नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी कन्हेरी वन, कन्हेरी गाव, पिंपळी, काटेवाडी गाव, ढेकळवाडी इथल्या शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना करण्यासहित काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले.


रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा डावा कालवा फुटला. कालव्याचे पाणी रस्त्यावर, शेतात आले. बारामतीतील दीडशेहून अधिक लोकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. तीन इमारतींना तडे गेले आहेत. पावसाने झालेल्या नुकसानाची पाहाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भले पहाटे केली.