
*रत्नागिरी-* शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने कलाक्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळा शनिवारी सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे संपन्न झाला. यामध्ये राज्यस्तरीय जीवनगौरव आणि कला गौरव पुरस्कार देऊन कोकणातल्या प्रतिष्ठावान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील व कोकणातील प्रसिद्ध फोटोग्राफर चौगुले फोटोचे मालक गुरु चौगुले यांना कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुरु चौगुले हे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. फोटोग्राफरसाठी त्यांनी शेकडो मोफत वेबिनार व कार्यशाळांचे आयोजन केलेले आहे. फोटोग्राफरच्या संघटना बांधणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी चित्रित केलेल्या अनेक शॉर्ट फिल्म ना पारितोषिक भेटलेली आहेत. फोटोग्राफी क्षेत्रात यापूर्वी आदर्श छाचित्रकारसह फोटोग्राफीची सुद्धा अनेक पारितोषिक त्यांना मिळालेली आहेत. अनेक सामाजिक संस्थांवर ते काम करत असतात. कोकणातल्या युवक युवतींना नाट्य सिनेमा आणि मॉडेलिंग द्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. स्थानिक बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असतात. व्यक्तिगत आणि इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले सामाजिक शैक्षणिक कार्य बघून शिव-स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने त्यांना यावर्षीचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कला नाट्य राजकीय क्षेत्र यामधील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला.