सुप्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप…

Spread the love

*मुंबई-* मनोरंजन विश्वातून दु:खद माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारे अभिनेते मुकुल देव यांचे निधन झाले आहे. ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘यमला पगला दीवाना’ यांसारख्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवली होती.  मुकुल देव यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.  त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुकुल देव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९७० रोजी दिल्ली इथं झाला. मुळच्या पंजाबमधील जालंधरजवळीत गावातलं हे कुटुंब नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं दिल्लीत स्थिर झालंय. त्यांचे वडील हरी देव हे सहाय्यक पोलिस आयुक्त होते आणि त्यांनीच मुकल यांना अफगाण संस्कृतीची ओळख करून दिली. त्यांचे वडील पश्तो आणि पर्शियन भाषा बोलू शकत होते. त्यांचा भाऊ राहुल देव हा देखील सर्वपरिचित अभिनेता आहे. मुकुल देव यांनी १९९६ च्या दस्तक चित्रपटातून सुष्मिता सेनबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी अजय देवगणबरोबर ‘सन ऑफ सरदार’, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘कोहराम’ आणि सलमान खानबरोबर ‘जय हो’ यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटातून भूमिका साकारल्या.

त्यांनी अनेक पंजाबी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केलं. शरीक या पंजाबी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. अभिनयाव्यतिरिक्त मुकुल देव हे रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकादमीचे प्रशिक्षित पायलट होते. त्यांनी जवळजवळ एक दशक व्यावसायिक पायलट म्हणून काम केलं आहे. त्यांनी अभिनय कारकिर्दीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यापूर्वी त्याने एक वैमानिक प्रशिक्षण संस्था देखील चालवली. २५ जुलै २०२५ रोजी रिलीज होत असलेल्या अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात मुकुल रायनं काम केलंय. त्याचा हा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page