
संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी ते शास्त्री पूल दरम्यान गॅस पाईप लाईन चे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केल्याने वाहन चालकांना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी स्थानिक कमी करू कॉन्ट्रॅक्टर कोणतीही खबरदारीचे उपायोजना करत नाही. गडाच्या वाहतुकीसाठी माणसांची उपलब्धता नसते. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते. पावसाळा चालू झाल्याने काम बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शास्त्री पूल मार्गे गणपतीपुळे प्रचंड गाड्यांची वाहतूक…
मुंबई गोवा हायवे चे काम चालू असल्याने व पर्यटकांची शास्त्री फुल मार्गे गणपतीपुळे व रत्नागिरी ला जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सदर रस्त्यावरून चालू आहे. सदरची वाहतूक लक्षात घेता सदर रस्ता काँक्रिटी करण्याचे काम साठी एम एस आर डी सी त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याचे टेंडर झाले असून लवकरच रस्त्याचे काम चालू होणार आहे.
रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य…
शास्त्री पुलापासून फुणगुस मार्गे गणपतीपुळे जाता येत असल्याने या मार्गावर आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते त्यात संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अनेक वाहन चालक कोंड असुर्डे मार्गे संगमेश्वर बाजारपेठ असा प्रवास करतात.तसेच हा महिना सुट्ट्यांचा असल्याने गणपतीपुळे येथे जाणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आहेत.ऐन पर्यटनाच्या हंगामात पाईप लाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे.सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळत आहे.हा मार्ग आधीच पुरेसा रुंद नाही त्यात करण्यात आलेले खोदकाम, रस्त्यावर पसरलेला चिखल यामुळे वाहनचालक व पादचारी यांची कसरत होत आहे.दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर आहे.यासाठी लवकरात लवकर उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा वाहन चालक करत आहेत.
संबंधित रस्त्याच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष…
सदर रस्ता एम. एस .आर . डी .सी अंडर असून त्यांचे साधी कार्यालय ही रत्नागिरी मध्ये नाही तक्रार करायची तर कुठे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या समोर आहे. पीडब्ल्यूडी डिपारमेंट जाणून बसून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. भरपूर ठिकाणी मशीनच्या साह्याने वाढीव खुद कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हि नुकसान झाल्याचे कळते. संबंधित यंत्रणेने पाईप टाकायचे जागा निश्चित करून दिलेली नसतानाही पाईप टाकल्याचे निदर्शनास आले आहे. तरी मनमानी करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात येते.