तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पुररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक , नागरिकांचा विरोध झुगारुन राजापूरात तिच पुररेषा लागु ,नव्या पुररेषेने राजापूरचे अस्तित्वच धोक्यात…

Spread the love

राजापूर – साधारण १७७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्याने मोठी जहाजे बंदरात येणे बंद झाल्याचे उल्लेख  राजापूरातील तत्कालीन व्यापारी मंडळाच्या बाडात ( बाड – दफ्तर ) मिळत असले तरी सन १९८३ साली अतिवृष्टी होवुन आलेल्या महापूरानंतर राजापूर शहरात पुररेषा अस्तित्वात आली . गेली चार दशके राजापूरचा विकास या जुण्या पुररेषेत अडकलेला असतानाच आता लघुपाठबंधारे विभागाने नव्याने पुररेषा रेखांकित केली आहे .
         

साधारण तिन वर्षापुर्वी गूगल मॅप च्या माध्यमातुन तयार करण्यात आलेल्या या नव्या पुररेषेला तत्कालीन नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकानी जोरदार विरोध केला होता . राजापूर नगर परिषदेचे तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष जमीर खलिफे व माजी विधानपरिषद सदस्या सौ . हुस्नबानू खलिफे यानी महाराष्ट्र शासनाकडे या गूगल मॅपद्वारे रेखांकित करण्यात आलेल्या पुररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली होती . व त्या मागणीप्रमाणे पाटबंधारे मंत्र्यानी पाटबंधारे विभागाला फेरसर्वेक्षण करण्याचे आदेशही दिले होते .
   

मात्र शासनाचे पुररेषेचे सर्व नियम व पाटबंधारे विभागाचे निकष या नुसार पुन्हा चार वर्षापुर्वी रेखांकित करण्यात आलेली पुररेषाच लागु करण्यात आलेली आहे . आणि ही पुररेषा शहरासाठी बाधक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधुन उमटत आहेत .

………………………

    
आपण नगराध्यक्ष असताना शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने राजापूरची पुररेषा वाढवली होती . मात्र त्यावेळी आपण शासनाकडे या नव्या पुररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली होती . तरीही पुन्हा फेरसर्वेक्षणाअंती तीच पुररेषा लागु करण्यात आली आहे . सध्या नव्याने लागु करण्यात आलेल्या पुररेषेमुळे राजापूर शहराच्या विकासाला खिळ बसणार आहे . तरी यावर शासनाने योग्य तो निर्णय घेवुन राजापूर शहराला उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत

– जमीर खलिफे , माजी नगराध्यक्ष , राजापूर नगर परिषद

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page