
संगमेश्वर / दिनेश अंब्रे- संगमेश्वर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संतोष एकनाथ सुर्वे राहणार नावडी भंडारवाडी यांचा महावितरण कंपनीतून तीस वर्षे सेवा बजावून वरिष्ठ यंत्रचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर व माजी सैनिक पाल्य दिनेश अंब्रे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला .तसेच त्यांची मुलगी तिर्था संतोष सुर्वे ही गोगटे कॉलेज रत्नागिरी (बायोटेक्नॉलॉजी विभाग) येथून ‘ O’ ग्रेडने(1st Class) सुयश प्राप्त केल्याबद्दल तिचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन दिनेश अंब्रे यांनी सन्मान केला.


यावेळी ग्रामस्थ विनय मुरकर, सुदेश गडदे, विक्रांत सुर्वे, प्रसाद सुर्वे , सुरेश भाटकर ,मनीष सुर्वे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी कुमारी तीर्था हिला भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. हा छोटे खानी कार्यक्रम संतोष सुर्वे यांच्या निवासस्थानी भंडारवाडी येथे संपन्न झाला.