भाजपा महीला मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महीलांचा सन्मान

Spread the love

सिंधुदुर्ग : जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान महिला मोर्चाच्या वतीने भाजपा तालुका कार्यालयात करण्यात आला .
स्वत:च्या कार्यकर्तुत्वावर समाजात आपले स्थान निर्माण करत समस्त महिला वर्गात एक आदर्श निर्माण केला अशा वेंगुर्ले तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सन्मानपत्र , शाल व पुष्प देऊन करण्यात आला .
यावेळी महीला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांनी सर्वांचे स्वागत केले . तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांनी देशाच्या ७५ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे सांगितले . तसेच देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारी पण आता महिला भगिनी आहे . घर सांभाळणारी महिला ही जसा कुटुंबाचा आधार असते , तसे आज ती देशाचा आधार बनली असल्याचे सांगितले .त्यामुळेच देशाचा अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी आज एक महिला निर्मला सितारामण च्या रुपात समर्थ पणे सांभाळत असल्याचे सांगितले .
आज झालेल्या कर्तुत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात उद्योजीका व सामाजिक कार्यकर्त्या प्राची प्रल्हाद मणचेकर ( उभादांडा – मानसिश्वर ) , शिवणक्लास घेऊन घरचा चरितार्थ चालवणारी रागिणी राजेंद्र परुळेकर ( परुळेकर दत्त मंदिर ), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो प्रशिक्षणार्थींना विवीध प्रकारची कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी प्रणाली गणेश अंधारी ( गाडीअड्डा ), साईमंगल व साईदरबार हाॅलची संचालिका तसेच कॅटरींग व्यवसाईक अक्षता अंबरीश मांजरेकर ( सुंदरभाटले ), वेंगुर्ले तालुका गिरणी मालक संघाच्या अध्यक्षा व महिला उद्योजिका आकांक्षा आनंद परब ( देवुळवाडी ) , काजु कारखानदार व उद्योजिका दुर्वा दिपक माडकर ( दाभोलीनाका ), अगदी लहान वयात टेलरिंग व्यवसाय करुन कुटुंब सांभाळणारी संगीता संतोष नाईक ( राऊळवाडा) नवरयाचे निधन झाल्यानंतर स्वत:च्या पायावर उभी राहून स्टाॅल चालवुन मुलांचे पालन पोषण करणारी सायली सखाराम परब ( सातेरी मंदिर ), योगशिक्षिका व मेडिकल योग थेरीपीस्ट साक्षी जयंत बोवलेकर ( हाॅस्पिटलनाका ), स्फूर्ती गृहउद्योगामार्फत विविध प्रकारचे मसाले व पदार्थ बनविणाऱ्या स्मिता सचिन होडावडेकर ( मारुती मंदिर ), कापड दुकानदार व महिलांचे ड्रेसमटेरीयल बनविणाऱ्या स्मिता चंद्रशेखर कोयंडे ( गिरपवाडा ) इत्यादी महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , महीला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , ता. सरचिटणीस वृंदा गवंडळकर , नगरसेवीका श्रैया मयेकर , नगरसेवीका साक्षी पेडणेकर , नगरसेवीका कृपा मोंडकर , नगरसेवीका पुनम जाधव , अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार , रसिका मठकर , मानसी महेश परब , सरीता शिवराम परब , मिनाक्षी धर्माजी माडकर , अंकीता देसाई , परबवाडा ग्रा.पं.सदस्या अरुणा अनिल गवंडे इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रार्थना हळदणकर हीने केले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page