मुंबई : मुंबईत भारतीय नौदलाच्या (Navy) ध्रुव हेलिकॉप्टरचा (Helicopter) अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात क्रू सदस्यांपैकी सर्वांनाच वाचवण्यात यश आलंय. हेलिकॉप्टरमधील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती नौदलाने दिली आहे. नौसेनेच्या एका गस्तीवरील जहाजाने हेलिकॉप्टरमधील क्रू मेंबर्सना वाचवलं. हा अपघात नेमका कसा झाला, यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. अपघातामागील कारणांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असं नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.