
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ (Akshaya Tritiya 2025) हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
दबाव ज्योतिष : अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2025) हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ‘अक्षय’ या शब्दाचा अर्थ “शाश्वत” किंवा “कधीही कमी न होणारा” असा होतो, तर तृतीया म्हणजे “तिसरा” दिवस. त्याच्या नावाप्रमाणेच, असे मानले जाते की या दिवशी केलेले कोणतेही चांगले काम, गुंतवणूक किंवा सुरुवात चिरस्थायी यश आणि समृद्धी आणते. तसेच संबंधित प्रिय प्रथांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे, जे संपत्ती आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळं या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात गाड्यांची आणि सोन्याची खरेदी करतात. यंदा कधी आहे अक्षय्य तृतीया जाणून घ्या शुभ मुहूर्त…
*अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Akshaya Tritiya Shubh Muhurat) :*
बुधवार, (३० एप्रिल) रोजी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल.
सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त….
३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करू शकत नसाल, तर अक्षय्य तृतीयेला तुम्ही माती, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरीदेखील खरेदी करू शकता.
काय आहे अक्षय तृतीयेचा इतिहास …
पांडवांना अज्ञावासाची शिक्षा झाल्यामुळं भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक अक्षय पात्र दिलं होतं. हे पात्र कधीही रिकामं राहात नसल्यानं त्यात सतत अन्न राहात होतं. त्यामुळं पांडवांना कधीही अन्नाची कमी पडली नाही. श्रीकृष्णांनी पांडवाना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले जप, ज्ञान, दानामुळं अक्षय फळप्राती मिळत असल्याचं सांगितलं जातं. म्हणून या मुहुर्ताला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. हिंदू धर्मात असलेल्या भविष्यपुराण, मत्सपुराण, पद्मपुराण, विष्णूधर्मोत्तर पुराण आणि स्कंदपुराणात अक्षय्य तृतीयेचा विशेष उल्लेख आढळतो. अक्षय्य तृतीयेला केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळत असल्यामुळं या दिवशी देवांसह पित्रांचं पूजन करण्यात येतं. भगवान विष्णू यांना वैशाख महिना विशेष प्रिय असल्यानं अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची या दिवशी पूजा करण्यात येते, असंही सांगण्यात येतं.