
*देवरुख दि २३ एप्रिल-* युवा सेना सहसचिव आणि संगमेश्वर तालुका क्रीड़ा समितीचे सदस्य श्री. प्रद्युम्न माने यांनी तालुका क्रीड़ा समिती अध्यक्ष आणि आमदार श्री. शेखर निकम यांच्या सोबत संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल विकासासाठी क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, ना. श्री. दत्तात्रय मामा भरणे यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली.
भेटीदरम्यान संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल येथे शासन नियमानुसार कबड्डी आणि खो-खो या खेळांसाठी इनडोअर स्टेडियम व्हावे अशी विनंती केली.