रत्नागिरी : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्यावतीने १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप होणार आहे. यात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सर्व घटकांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केले.
देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात आयोजित सभेत पाटील बोलत होते. जुनी पेन्शन योजना हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे. आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले, असे पाटील म्हणाले. या वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब संघटना या संपात पूर्ण क्षमतेने उतरत असल्याचे जाहीर केले.
जाहिरात :