
रत्नागिरी : रत्नागिरीत जलजीवन मिशनच्या योजनेतील कामाची चौकशी होणार आहे. जलजीवन मिशनच्या कामात तब्बल 600 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. RTI कार्यकर्ते स्वप्नील खैर यांच्या तक्रारीनंतर आता प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे.
जलजीवन मिशन झालेल्या भ्रष्टाचारावरती जलजीवन मिशनचे डायरेक्टर यांच्याकडून कमिटी गठीत….
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेत तब्बल 600 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या आरोपांमुळे जिल्हा प्रशासन हादरलं असून, तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे. RTI कार्यकर्ते स्वप्नील खैर आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या तक्रारीनंतर जलजीवन मिशनचे डायरेक्टर यांच्या आदेशानुसार प्रशासनाने चौकशीचा निर्णय घेतला असून, यासाठी 4 सदस्यांची विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. याविशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत संजय दिपकर (उप अभियंता), प्रवीण म्हात्रे (सेवानिवृत्त उपअभियंता), चंद्रसेन गीदे (लेखाधिकारी), दिनेश पोळ (उपलेखापाल) यांचा समावेश आहे. या समितीचे सदस्य 15 आणि 16 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपस्थित राहून चौकशी करतील, आणि त्यानंतर सविस्तर अहवाल अभियान संचालकांकडे सादर केला जाईल. जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधीची उधळपट्टी झाली असून, अनेक ठिकाणी कामे कागदावरच झाल्याचा आरोप RTI तून समोर आला आहे.


जल जीवन मिशनचे उद्दिष्ट साध्य होणार का?
जलजीवन मिशन मध्ये 55 लिटर पाणी प्रत्येक नागरिकाला देणे गरजेचे आहे. परंतु योजनेचा मूळ मुद्दाच बाजूला राहिल्याने आज रोजी टॅंकरने काही गावांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. मुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योजना राबवताना नागरिकांना विश्वासात न घेताच कॉन्ट्रॅक्टरच्या संगणमत करून योजना राबवल्या असल्याचे अनेक गावांमध्ये बोलण्यात येत आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे का? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आजपर्यंत अनेक आंदोलने झाले असून कोणत्याही आंदोलनला पाणीपुरवठा अभियंता मयुरी पाटील जबाबदारीने उत्तर दिलेले नाही. लोकांना सदर योजनेसाठी उपोषणाला बसवावे लागेल ते बाब लाजिरवाणी असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं जातं, मात्र प्रत्यक्षात ही योजना ठेकेदार आणि प्रशासनाच्या संगनमताने भ्रष्टाचाराचं साधन बनली असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार असून, दोषींवर कडक कारवाई होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



जलजीवन मिशन संदर्भामध्ये मयुरी पाटील वागणे संशयस्पद…
जल जीवन मिशन संदर्भामध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही म्हणून १५/८/२०२४ ला जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरी येथे उपोषण करण्यात आले होते. चर्चेसाठी बोलवण्याचे सांगून नही चर्चेसाठी बोलवण्यात आलेले नाही. नंतर १० जानेवारी पासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले त्याला सुद्धा मयुरी पाटील कडून कोणतीही दाद देण्यात आली नाही पण नंतर आत्मदहन करणार असे अशी लेखी पत्रा द्वारे कळविल्या नंतर प्रकल्प संचालक पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ह्यांच्या सोबत चर्चा केल्या नंतर ही समिती नेमण्यात आली आहे . मयुरी पाटील यांना वारंवार पत्र पाठवू नये त्यांच्याकडून योग्य प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. कॉन्ट्रॅक्टर ना पाठीशी घालण्याचे काम मयुरी पाटील करत आहेत. हे दिसून आलेले आहे. मयुरी पाटील यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वप्निल कर यांनी केली आहे. सर्व भ्रष्टाचारामध्ये लपवण्याचे काम मयुरी पाटील करत आहेत हे आज सिद्ध झालं आहे. आता ही समिती काय चौकशी करते ते पाहून सर्वांना मुंबई उच्च न्यायालयात ह्या विषयी याचिका दाखल करून एस आय टी समिती नेमण्यात यावी म्हणुन विनंति करणार आहे.

जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे…
रत्नागिरी जिल्ह्यातील कामे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. आज पर्यंत अनेक निवेदन देण्यात आली परंतु कोणतीही कारवाई मयुरी पाटील यांच्याकडून करण्यात आलेली नाही. जलजीवन मिशन मधील कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून कामात संदर्भ मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पाण्याची लाईन तीन फूट खाली टाकायचे असून अनेक गावांमध्ये कोठेही तीन फूट खाली लाईन टाकण्यात आलेली नाही. अनेक गावांमध्ये मांडण्यात आलेल्या टाक्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्या संदर्भातील फोटोही स्वप्निल खैर यांनी प्रशासनाकडे सादर केले आहेत. पाईप चा दर्जा ही चांगलं नाही आहे. तसेच अनेक गावांमध्ये लोकांना विश्वासात न घेताच कामे करण्यात आलेले आहेत. तसेच काही गावांमध्ये पाईप धुळखात पडलेले आहेत. जल जीवन मिशनचे काम एक ते दोन वर्षात पूर्ण करायचे होते परंतु आज अंदाजे 90% योजना पूर्ण आहेत. हे काय झाले याची चौकशी होणे फार गरजेचे आहे. आजपर्यंत अनेक लोकांनी आंदोलने केली असून सर्व आंदोलनात केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणाचा दबाव अधिकाऱ्यांवर आहे हा प्रश्न उपस्थित होते.

अनेक आंदोलने होऊनही कामाचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. लवकरच या संदर्भामध्ये चौकशी मधून सर्व काही बाहेर येईल असे नागरिकांमधून बोलले जात आहे. सदर कामासंदर्भामध्ये आवाज उठवणारे स्वप्निल खैरे यांच्या अभिनंदन करण्यात येते