
संगमेश्वर ( मकरंद सुर्वे ): बदलत्या युगात आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी समाजातील सर्व बंधू भगिनी यांनी एकत्र येऊन आपल्या एकतेचे,परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करण्यासाठी संगमेश्वर येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात होते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात सर्व सहभागी झाले होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या नववर्ष स्वागत यात्रेत पारंपारिक वेश परिधान करून सहभागी झाले होते.करण्यात आले आहे.माभळे संगमेश्वर येथील जलाराम ट्रेडिंग कंपनी येथून या शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. नावडी बाजारपेठ गणेश आळी मार्गे रामपेठ मधून श्री देव गणपती मंदिर पर्यंत ही नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली.या यात्रेत ढोल ताशा पथक, रथ, भगवे ध्वज आदींचा समावेश होता.