औरंगजेबाने हिंदुंची मंदिरे का पाडली? इतिहासकार इरफान हबीब यांनी स्पष्टच सांगितलं…

Spread the love

त्या काळात भारतात विविध धर्मांचे लोक आपापल्या धार्मिक परंपरांनुसार पूजा करत होते. याउलट, युरोपमध्ये मात्र अन्य धर्मीयांना कोणतेही स्वातंत्र्य दिले जात नव्हते.

नवी दिल्ली- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुघल सम्राट औरंगजेबावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दिवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हे सर्व सुरूअसतानाच प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या कारकिर्दीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, औरंगजेबाने जवळपास पन्नास वर्षे (१६५८ ते १७०७) भारतावर शासन केले. मंदिरांबाबत त्याने घेतलेली भूमिका यापूर्वी कोणत्याही मुघल सम्राटाने स्वीकारली नव्हती.

औरंगजेब आणि मंदिरांचे विध्वंस…

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतल त्यांनी यावर भाष्य केलं आहे.  इरफान हबीब यांच्या म्हणण्यानुसार, १६६८ च्या सुमारास औरंगजेबाने काही मंदिरे पाडण्यास सुरुवात केली. जरी त्याच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे सुरक्षित राहिली, तरीही काही मंदिरे त्याने उद्ध्वस्त केली असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आढळतात. विशेषतः मथुरा, वृंदावन आणि काशी-बनारस येथील मंदिरे यामध्ये समाविष्ट होती. या घटनांचे दस्तऐवजीकरणही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.त्यावेळच्या अधिकाऱ्यांच्या नोंदींनुसार, मंदिरांचे विध्वंस केल्याने त्याला धार्मिक पुण्य लाभेल आणि ईश्वर प्रसन्न होईल,असा त्याचा विश्वास होता.  मात्र, त्याने नक्की किती मंदिरे पाडली, याचा नेमका अंदाज लावणे कठीण आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page