चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे भारतासमोर 252 धावांचे आव्हान; भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा..

Spread the love

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सूरु आहे.न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर धावांचे आव्हान दिले आहे. डॅरिल मिशेलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर न्यूझीलंड  धावांपर्यंत मजल मारू शकला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे भारतासमोर 252 धावांचे आव्हान; भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा..



दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम  फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान ठेवले आहे. डॅरिल मिशेल आणि  मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून न्यूझीलंड 251 धावांपर्यंत मजल मारू शकला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 63 धावा केल्या आल्या आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. भारताकडून कुलदीप यादवसह वरुन चक्रवर्तीने  प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जाडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करायची असेल तर 252 धावांचे आव्हान पेलावे लागणार आहे.


न्यूझीलंडचा डाव..


चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत.  या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 251 धावा करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान उभे केले आहे. भारताला अंतिम सामना जिंकायचा असेल तर 252  धावा कराव्या लागणार आहेत.

न्यूझीलंडकडून विल यंग 23 चेंडूत 15 रन काढून वरुण चक्रवर्तीचा शिकार ठरला आहे. फॉर्ममध्ये असणारा रचीन रविद्र 29 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने आपल्या गुगलीवर आऊट केले. तर भरवशाचा फलंदाज केन विल्यमसनही (14 चेंडूत 11 धावा) फार काही करू शकला नाही. त्याला देखील कुलदीपने आपल्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड केला. रवींद्र जाडेजाने  न्यूझीलंडला चौथा झटका दिल आहे. त्याने टॉम लॅथम एलबीडब्लू आऊट  केले. टॉम लॅथमने  30 चेंडूत 14 धावा केल्या आहेत.

त्यांनंतर आलेल्या ग्लेन फिलिप्सने(52 चेंडूत 34 धावा) थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला वरुण चक्रवर्तीने माघारी धाडले. तर एक बाजू लावूनज धरणाऱ्या डॅरिल मिशेलला मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 101 चेंडूत 63 धावा केल्या. त्यात त्याने 3 चौकार लगावले आहेत. त्यानंतर आलेला न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर(10 चेंडूत 8 धावा) धाव बाद होऊन माघारी फिरला. विराट कोहलीच्या थ्रोने तो आऊट झाला. तर मायकेल ब्रेसवेल हा 40 चेंडूत 53 धावा करून नाबाद राहीला. भारताकडून कुलदीप यादवसह वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जाडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडचा संघाची प्लेइंग इलेव्हन-
विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि मॅट हेन्री/नाथन स्मिथ.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page