
*संगमेश्वर –* संगमेश्वर तालुक्यात शेकडोहून अधिक प्राचीन मंदिरे दुर्लक्षित आहेत.त्यापैकी कसबा गाव हा पुराणात प्रति काशी म्हणून ओळखला जातो. तर इतिहासात धर्मवीर छत्रपती संभाजी राजे हे कसबा येथील अलकंनंदा काठावर वसलेल्या संगमेश्वर मंदिरात शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी येत असत असा उल्लेख सापडतो.
वरील गडकिल्ले संवर्धन मराठा रॉयर्स च्या माध्यमातून प्रति वर्षी येथील दुर्लक्षित मंदिराची साफ सफाई करण्याचे काम या संस्थेचे पदाधिकारी करीत असतात.
गेली तीन दिवस हे पदाधिकारी कसबा येथे वास्तव्यास होते, त्यानी अलकनंदा नदी किनारी असलेल्या संगमाची साफ सफाई करून ढासळलेली तटबंदी श्रमदानातून उभारली.
तसेच येथील संगम घाटाचे जय श्री महाकाल असा डिजिटल फलक लावून नामकरण केले.

यावेळी, संस्थेचे अध्यक्ष, श्री, राहुल खैर, उपाध्यक्ष, रोहीत जाधव, सचिव, अमित गुरव, अभिजित गावडे, सुमित गावडे, संपर्क प्रमुख, शैलेश पवार, अभिजित मांडवकर अभिषेक पाटील, नितेश नाडकर, अनिकेत भोगले, महेश चव्हाण, स्मित सकपाळ, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी विभागाचे विवेक चव्हाण, रुपेश शिंदे, जय श्रीराम महाकाळ ग्रुपचे,सुरेश बावधाने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते,
यांना येथील स्थानिक म्हणून श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री, श्रीकांत बेडेकर (गुरुजी ) यांनी मोलाचे सहकार्य केले.
येथील गणेश घाटाला जय श्री महाकाल असे नामकरण करणेत आले त्यावेळी वरील संस्थेच्या कार्यकर्त्यासोबत संगमेश्वर तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष, नरेंद्र खानविलकर, कसबा गावच्या सरपंच श्रीम, पुजा लाणे, जितेंद्र पेंढारी, कसबा पोलीस पाटील, श्री, प्रवीण चव्हाण, मंगेश राऊत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.