ठाणे (प्रतिनिधी) राज्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना या विषयावर आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी लक्षवेधी सुचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.त्यावर त्वरीत उपाययोजना करुन राज्यातील सर्व महानगरपालिका ,नगर परिषदा यांनी प्रत्येक जिल्हामध्ये व शहरी भागामध्ये श्वान दत्तक योजना ताबडतोब चालू करावी,असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांननी सांगितले,अशी माहीती आ.प्रताप सरनाईक यांनी दिली.
या योजनेमध्ये शहरातील सर्व श्वान स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रीत करुन त्यांचे निबिर्जीकरण (नसबंदी ) करावी तसेच आजारी श्वानांवर स्थानिक स्वराज्य संस्थेने उपचार करावेत.शहरातील प्राणीमित्र संघटना व प्राणीमित्रांनी आवाहन करुन जे श्वान चांगल्या स्थितीत आहेत त्या श्वानांची दत्तक योजना चालू करावी.जर एखादी प्राणीमित्र श्वान दत्तक घ्यायला तयार असेल परंतु त्याची आर्थिक स्थिती नसेल अश्या श्वानांच्या वार्षिक आरोग्याचा खर्च हा स्थानिक स्वराज्य संस्थेने करावा व खाण्यापिण्याचा खर्च हा प्राणीमित्रांनी करावा,अश्या प्रकारच्या सूचना आ.प्रताप सरनाईक यांनी मंत्री विखे पाटील यांना केल्या.त्यावर पशुसंवर्धन मंत्र्यांनी या सर्व सूचनांचा अंतर्भाव करुन राज्यामध्ये सर्व श्वान दत्तक योजना चालू करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे श्वान दत्तक योजना चालू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.असे सरनाईक यांनी सांगितले.