मुंबई (शांताराम गुडेकर) डॉ.बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) चा तिसरा पदवीदान समारंभ ४ मार्च २०२३ रोजी विसनजी रावजी सभागृह (माटुंगा पूर्व) येथे थाटामाटात संपन्न झाला.
सन २०२१-२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना एस.एन. डी. टी महिला विद्यापीठाकडून त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रमुख पाहुण्या फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी येथील डेप्युटी कॉन्सुलेट जनरल श्रीमती मारिया आयनिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.श्रीमती मंजुलाबेन गुणवंतराय शाह पदव्युत्तर अभ्यास विभागाची कु.युक्ता शर्मा,श्रीमती कमलाबेन गंभीरचंद शाह डिपार्टमेन्ट ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशनची कु.अवंतिका परब आणि डॉ.बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्सची कु.डॉली जैन या सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी १९० पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थिनींना पदव्या प्रदान करण्यात आल्या.सन २०२२-२३ या वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनींसह माजी विद्यार्थिनी कु.मुग्धा प्रधान, कु.काजल ठोसानी भाथेना, कु. कस्तुरी शेलार आणि कु.बी.जयश्री यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.