बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटना; हिमकडा कोसळून 57 जण बर्फाखाली दबले?…

Spread the love

बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटनाघजली आहे. हिमकडा कोसळून 57 लोक बर्फाखाली दबल्याची माहित समोर येत आहे.

बद्रीनाथ ,उत्तराखंड- बद्रीनाथमध्ये हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. 57 कामगार दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 15 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात  बद्रीनाथमधील माना गावातील सीमावर्ती भागात सीमा रस्ते संघटनेच्या छावणीचे बांधकाम मजूर काम करत होते. यावेळी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन कॅम्पजवळ एक मोठा हिमकडा कोसळला. यावेळी येथे कार्यरत असलेले 57 कामगार बर्फाखाली दबले गेले.  57 कामगारांपैकी 10 कामगारांना वाचवण्यात यश आले असल्याचे पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले. आयटीबीपी आणि लष्कराचे जवान येथे युद्ध पातळीवर मदतकार्य करत आहेत.

दरम्यान, या परिसरात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे बचावक पथकाला बचाव कार्यात अनेक अडथळे येत आहेत.  लाहौल आणि स्पीती पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी या भागात हिमस्खलनाचा इशारा दिला होता. अलर्ट म्हणून प्रसिद्धी पत्रकही जारी करण्यात आले होते. काही अतिउतारांवर मध्यम आकाराचे हिमस्खलन होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांना आणि स्थानिकांना सावधगिरी बाळगण्याचा सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच पर्यायी मार्वारुन मर्यादित वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

चमोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे गोपेश्वर चोपटा मोटर रोड, हनुमानचट्टीच्या पलीकडे बद्रीनाथ आणि नीति घाटी रस्ता हिमवृष्टीमुळे बंद झाला आहे. बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, नीति व्हॅली, चोपटा आणि औली येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे आणि आतापर्यंत 2 फुटांपेक्षा जास्त बर्फ जमा झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page