
निवडणुकीतील आश्वासनांची परिपूर्ती, देवरूखच्या विकासासाठी कटीबध्द- आमदार शेखर निकम
देवरूख- चिपळुण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीवेळी आपण विविध विकासकामांची जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता या भूमीपूजन सोहळ्यांनी होत आहे. देवरुख परिसरातील ही कामे लववकरच मार्गी लागतील तसेच यापुढेही जो निधी लागेल तोही आपण देवू असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. काल गुरुवारी दुपारी देवरुख परिसरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवरुख कोल्हेवाडी येथील सभागृह, हसमवाडी येथील रस्ता, शाळा नंबर १ जवळील पूल, शाळा नंबर २ इमारतीसाठी निधी, पठारवाडी देवस्थान सभागृह, कांजीवरा व मुस्लीम मोहल्ला मशीद व मदरसा लादीकरण, सभागृह उभारणी, शाळा नंबर ४ जवळील गटार, खालची आळी येथे खेळाचे मैदान, पर्शरामवाडी पाखाडी व संरक्षक भिंत उभारणी या कामांचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी आमदार शेखर निकम यांचे कौतुक करताना निकम सर यांचे देवरूख शहरावर विशेष लक्ष असून त्यांच्या माध्यमातून विकाससकामे होत असल्याचा आनंद होत आहे. असे म्हटले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, देवरूख शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, बाळु ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, वैभव पवार, अभिजित शेट्ये, मुकुंद जोशी, सुशांत मुळ्ये, तुकाराम किर्वे, डाॅ. हुसेन शेख, संतोष लाड, बापू गांधी, जयंत राजवाडे, संजय राजवाडे, बबन बोदले, राजू वणकुंद्रे आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.