
यूएसए- कालच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला ४५ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताच्या संघाने जवळजवळ आता सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे.
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला. यामध्ये भारताच्या संघाने गोलंदाजीने आणि फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात बांग्लादेशला पराभूत केले तर कालच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला ४५ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताच्या संघाने जवळजवळ आता सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे अपडेटेड पॉइंट्स- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून केवळ ८ वर्षांचा जुना हिशोबच चुकता केला नाही तर मोहम्मद रिझवानच्या टीमला स्पर्धेतून जवळजवळ बाहेरही केले. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानवरील या विजयानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी पॉइंट्स टेबलमध्येही पहिले स्थान मिळवले आहे. आज ग्रुप अ मध्ये न्यूझीलंडचा सामना बांगलादेशशी होईल. जर किवी संघाने आज बांगलादेशला हरवले तर ग्रुप अ मधून भारत आणि न्यूझीलंडला सेमीफायनलचे तिकीट मिळेल, तर यजमान पाकिस्तानसह बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडेल.
https://x.com/BCCI/status/1893701270961062334?t=ZNABbFAcdirF2isDQLw0pg&s=19
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ५ व्या सामन्यानंतर, भारत ४ गुणांसह आणि +०.६४७ च्या नेट रन रेटसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तथापि, आज न्यूझीलंडला बांगलादेशला हरवून पॉइंट टेबल जिंकण्याची संधी असेल. खरंतर, न्यूझीलंडचा नेट रन रेट भारतापेक्षा खूपच चांगला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ६० धावांनी हरवल्यानंतर त्यांचा नेट रन रेट +१,२०० आहे.
पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, मिनी वर्ल्ड कपमध्ये सलग दोन सामने गमावल्यानंतर, हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट -१.०८७ आहे, आता त्यांची उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. जर आपण ग्रुप बी वर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ त्यांचे पहिले सामने जिंकून टॉप-२ मध्ये आहेत. २५ फेब्रुवारी रोजी या दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला जाणार आहे, अशा परिस्थितीत इंग्लंडला स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.
भारताच्या संघाचा पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. न्यूझीलंडचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता, या सामन्यांमध्ये त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. तर आज न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. यामध्ये जर न्यूझीलंडच्या संघाने सामना जिंकल्यास सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करेल तर बांग्लादेशने सामान जिंकल्यास त्याच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत राहतात.