
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यकृतीचा आस्वाद घेण्याचे वनविभागाचे आवाहन…
*रत्नागिरी-* रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत आहेत. वन्यजीवांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे ते पटवून देण्यासाठी स्थानिक लोक कलेच्या माध्यमातून सादरीकरण करणेसाठी मा विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांच्या संकल्पनेतून वन विभाग रत्नागिरी चिपळूण व डब्लूसीएस-इंडिया, रेनमॅटर फाऊंडेशन आयोजित
*संगीत बिबट आख्यान*
२५ फेब्रुवारी – ग्रामपंचायत सभागृह, मु.पो. केळवली, राजापूर, जि. रत्नागिरी
दुपारी ३ ते सायं ६
२६ फेब्रुवारी – श्री क्षेत्र मार्लेश्वर, वाहनतळ परिसर, मु.पो.मारळ, संगमेश्वर, जि. रत्नागिरी वेळ सकाळी १०. ते ०१
या वेळेत आयोजित करण्यात आले आहे तरी स्थानिक गावकरी विध्यार्थी, निसर्ग प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वन विभाग रत्नागिरी यांचे मार्फत करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी वन विभागाच्या श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी श्रीमती प्रियांका लगड सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी. डब्लूसीएस-इंडियाच्या संचालक डाॅ. विद्या अत्रेय, मानव-वन्यजीव सहसंबंध विभागाचे मॅनेजर निकीत सुर्वे, दिप्ती हमरसकर आणि पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर यांचे सहकार्य लाभले आहे.
*संगीत बिबट आख्यान विषयी*
कलेच्या माध्यामातून वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी सिताई क्रिएशन्सने ‘वन्यवाणी’ ही चळवळ सुरू केली आहे. त्यामधील संगीत बिबट आख्यान ही एक नाट्याकृती आहे. या नाट्याकृतीच्या निर्मित्या कुणिका बनसोडे-सावंत या असून लेखक-दिग्दर्शनाची धुरा मकरंद सावंत यांनी सांभाळली आहे. रोमांचक कथा आणि लोकसंगीताच्या माध्यमातून मानव-बिबट संघर्षावर हे नाटक भाष्य करते. कोकणातील तरुणांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. सदरचे नाटक पहावयास कोणतीही फी नाही. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.