
प्राचार्य डॉ. राहूल जाधव व सोबत विद्यार्थी वर्ग
मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड (प्रतिनिधी): सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मवीर भि. रा.तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयात इयत्ता 12 वर्गातील विध्यार्थ्याचा शुभेच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, प्रा. अशोक कंठाळे, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम, प्रा. साई पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उपस्थ्ति मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी प्रा. अशोक कंठाळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना महाविद्यालयामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करुन विध्यार्थ्यानी आपले करिअर घडवावे असे सांगून त्यांनी विध्यार्थ्यानां परीक्षेकरीता शुभेच्छा दिल्या. यानंतर यावेळी सिध्दी दिवेकर, मेघना यादव, सुमित दिवेकर, सोहम सोमण, अमेय जगताप, तनिशा खेरटकर अवनी खैरे, नसिमा खान, रिया जगताप, सुधीर भोसले आदी विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले,
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी सांगितले की, व्यवहारी जगात पदार्पण करताना विध्यार्थ्याने फार जाणिवपूर्वक व सावधतेने पाऊल उचलले पाहिजे. आपण नव्या उमेदीने कार्यप्रवृत्त झाले तर कोणतेही यश सहज साध्य करु शकतात. जे प्रगती करतात त्यांना संधी मिळते, जे प्रगती करत नाहीत त्यांना संधी मिळत नाही. सर्वसाधारणपणे महाविद्यालयीन युवकांमध्ये शालीनता, नम्रता हे गुण पहायला मिळत नाहीत, परंतु हे महाविद्यालय यासाठी अपवाद आहे, कारण येथील विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील जिल्हाळयाचे व प्रेम संबंध दिसून येतात.
यावेळी इयत्ता 12 वी वाणिज्य वर्गातील विध्यार्थ्यानां महाविद्यालयाच्या वतीने पुष्प देवून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूचत्रंचालन प्रा. अशोक कंठाळे यांनी केले तर आभार प्रा. साई पवार यांनी मानले.