
रत्नागिरी : येथील ब्रह्मचैतन्य मंडळाने १३ कोटी राम नामजपाची सांगता रविवारी झाली. या प्रसंगी चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांनी रामरक्षा या विषयावर सुरेख प्रवचन केले. जोशी पाळंद येथील घाणेकर यांच्या दत्तकुटी निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.
रामरक्षा का म्हणावी, हे सांगणारा रामरक्षेतील श्लोक भर्जनं भवबीजानामर्जन सुखसंपदाम् यावर चितळे यांनी विवेचन केले. रामरक्षेत रामाचे वर्णन केलेली रामाची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणून रामरक्षा म्हणावी. नुसते पाठांतर नको यावर त्यांनी भर दिला. नामस्मरण, नामजप यांचा अर्थ सांगून जपाची संख्या महत्वाची नसून श्वासावर जप होणे महत्वाचे असते याबाबत उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता श्रीधर पाटणकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. कल्याणकरी रामराया ही प्रार्थना व त्यानंतरही राम नाम नौका या भैरवीने कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बहुसंख्येने श्रोतृवर्ग उपस्थित होता.
प्रवचनकारांचा परिचय सविता बर्वे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अपर्णा मोने यांनी केले.