रत्नागिरी : कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे अपघात झाला मुंबईहुन बदलापूर वरून रत्नागिरी येथे जाणाऱ्या कार चालका चे नियंत्रण सुटून कार रस्त्या नजीक च्या शेतात शिरली या अपघातात ५ जण जखमी झाले हा अपघात शनिवारी सकाळी हा अपघात घडला कार चालक तेजस मदन वगळ वय २७ हा आपल्या ताब्यातील
कार क्रमांक एम एच ०५ इएच ६०१३ ही गाडी बदलापूर येथून घेऊन रत्नागिरी येथे असता आपेडे फाटा नजीक त्याचे कार वरील नियंत्रण सुटून कार रस्ता सोडून बाजूच्या थेट शेतात शिरली यामध्ये कार चालक तेजस मदन याचे सह कारमधील अमोल गजानन शिवलकर वय ६५, अंकिता अमोल शिवलकर वय ५९, यश अमोल शिवलकर वय २७ हे किरकोळ जखमी झाले
या अपघाताची माहिती श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजधाम मोफत रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्तांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून त्यांना तत्काळ
कळबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले.
जाहिरात