शहरातील उद्योजकाने गावाकडे उद्योग सुरू करणे ही बाब    तरुणांसाठी रोजगार मिळणेसाठी खरंच अभिनंदनीय ! – आमदार भास्कर जाधव…  

Spread the love

ऑटोकार कलर्स अँड कोटिंग्स या नवीन युनिटचा भूमिपूजन सोहळा संपन्न!

श्रीकृष्ण खातू  /धामणी – संगमेश्वर तालुक्यातील धामापूर पीर अशा खेडेगावात अविनाश सिताराम कांबळे यांनी जन्म घेऊन शून्यातून आपल्या अथक परिश्रमाने डोंबिवली सारख्या मोठ्या शहरात रंगाचा उत्तम उद्योग व्यवसाय सुरू करून अनेक गरिबांच्या कुटुंबातील मुलांना रोजगाराची संधी मिळवून दिली. व त्यांच्या कुटुंबाला भक्कम आधार दिला.तसेच अविनाश कांबळे हे असाच रंगाचा नवीन उद्योग युनिट सुरु करत असून त्याचा   बांधकाम भूमिपूजन सोहळा चिपळूण तालुक्यातील लोटे परशुराम या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळी भूमिपूजन सोहळ्यात मनोगत व शुभेच्छा व्यक्त करताना अविनाश कांबळे यांनी डोंबिवली सारख्या शहराकडून परशुराम सारख्या गावामध्ये उद्योग सुरू करत असल्याबाबत कौतुक करताना आमदार भास्कर जाधव बोलत होते..

            


या कार्यक्रमास चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी भूमिपूजनास  उपस्थित राहून‌ मनोगत व शुभेच्छा व्यक्त करताना या उद्योगातून आपल्या कोकणातील तरुणाला रोजगाराची संधी उपलब्ध नक्की होईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून या कंपनीसाठी मदतीकरीता आपण सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही दिली  व कोकणच्या व्यक्तीमालकाचा हा उदयोग सरू होत असून आम्हाला खरंच अभिमान नक्कीच आहे.असा आनंद व्यक्त केला.

     ‌‌‌‌‌
यावेळी मंचावर जयेंद्रत खताते , अजय बिरवटकर, पटवर्धन, धामणदेवी सरपंच, ठसाळे, बबन खंडागळे, मुकुंद वाजे, एमआयडीसी इंजिनियर, अंब्रे, अवनी कांबळे, शिवानी कांबळे, अमोल भोजने, मोहन मिरगल, रमाकांत कांबळे, अपर्णा कांबळे  मान्यवर  उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page