बीडमध्ये दोनच मुंडेंविरोधात समाज उभं राहत होतं. पण आज वाल्मिक कराड यांच्यामुळे…त्यात धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात…सुरेश धस यांचा टू द पॉईंट मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय. …
बीड /प्रतिनिधी- बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून तापलंय. सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले असून भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्त्वात त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर Zee 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ या विशेष कार्यक्रमात सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांच्याबद्दल गौप्यस्फोट केलाय.
निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी माझ्याविरोधात काम केलं’, असा थेट आरोप सुरेश धस यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की, ‘वाल्मिक पंकजा, धनंजय मुंडेंपेक्षा मोठा होऊ लागला होता. वाल्मिक कराड परळीचा डॉन पेक्षा डॉन आहे. वाल्मिक कराड हा डॉनपेक्षाही मोठा होता. धनंजय मुंडे वाल्मिक कराडचंच ऐकत होते. वाल्मिक समर्थकांची संख्या खूपच वाढली, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत सुरेश धस यांनी केला.
पंकजा मुंडेंचा लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला. आता तो माझ्याबद्दलच का झाला ते मला माहीत नाही. पंकजा मुंडेंची सीट निवडून आली नाही कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात 98 हजार मतं विरोधात गेली. ही मतं कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. सगळ्यांचं प्रारब्ध आम्ही ठरवू असं धनंजय मुंडे म्हणाले होते. आमचं प्रारब्ध तुम्ही ठरवणार म्हणजे तुम्ही काय मालक झाले का? या सगळ्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला. वाल्मिक कराडच्या दादागिरीचा प्रसार आणि प्रचार झाला. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीत जेव्हा आमची युती झाली, तेव्हा धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडेंसह प्रचारात वाल्मिक कराड यांचा फोटो झळकायला लागला. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आम्हाला न्याय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकता. पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात काम केलं. त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळणार नाही. त्या भाजपचे कमळ फुलवणार की शिट्टीवाल्याचा घरी जाणार. त्या भाजपनेचे पंकजा मुंडेंच काय करावं ते पाहावं.
बजरंग सोनावणेंच्या मुलीला ग्रामपंचायतीला पाडलं. काँग्रेस पक्षाला पैसे दिले. काँग्रेसचा सरपंच झाला तरीही चालेल पण बजरंग सोनावणेंची मुलगी निवडून यायला नको असं सांगण्यात आलं होतं. 50 लाख ते 1 कोटी एवढे पैसे दिले गेले. पंकजा मुंडेंचा पराभव झाला पण माझ्याबाबत निर्माण झाला. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं होतं.