*रत्नागिरी-* स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा आर्थिक प्रवास पहिल्या १० वर्षात फार बहरला नाही. मात्र नंतर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच अर्थकारण सातत्याने प्रबळ होताना दिसतय.
आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या *ठेवी ३३३ कोटी* झाल्या. त्याच बरोबर रत्नागिरी *प्रधान कार्यालयाच्या ठेवीनी १०० कोटींची सीमा ओलांडली.* एका शाखेने १०० कोटी ठेवी जमा करणे ही गोष्ट स्वप्नवत आहे. १० हजार रुपयांपासून सुरुवात करत १०० कोटींचा टप्पा हा प्रवास खूप आव्हांनात्मक आहे. पण विश्वाससार्हता, शिस्त, सचोटी आणि उपक्रमशील राहिल्याने २३ हजार पेक्षा जास्त ठेव खाती स्वरूपानंद च्या प्रधान कार्यालयात उघडली गेली आणि त्यातून १०० कोटींचा संचय झाला असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.
प्रारंभी ठेवीदारांशी केलेला प्रत्यक्ष संपर्क, संवाद, केलेली आर्जवी विनंती संस्थेची निर्माण केलेली आणि लोकांपर्यंत पोचवलेली पारदर्शक यशस्वी प्रतिमा यातून ठेवीदारां बरोबर दृढ विश्वासाचे ऋणानुबंध निर्माण झाले आणि अनेक कुटुंबांनी स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेला गुंतवणुकी साठी योग्य पर्याय म्हणून स्वीकारल आणि आजचा रिझल्ट साकार झाला.
प्रारंभीच्या काळात केलेली पायपीट, लोकसंपर्क याची फळे आता दिसत आहेत. उत्तम ग्राहक सेवा देणारा सेवक वर्ग यांचे ठेवीदारांशी निर्माण झालेले नाते याचेही मोठे योगदान आहे.
नजीकच्या दोन वर्षात ५०० कोटींचा ठेव टप्पा पार पाडू हा विश्वास आता अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देतो आहे.
सध्या नाव वर्ष स्वागत ठेव योजना सुरू आहे या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिल्या दिवशी १ कोटी २६ लाखांच्या नव्या ठेवी जमा झाल्या आहेत. या योजनेत १० कोटी ठेवींचं उद्दिष्ट आहे. या नववर्षाच्या स्वागत ठेव योजनेत १६ ते १८ महिने मुदतीच्या स्वरुपांजली ठेव योजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.५०% ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ८.७५% तर १९ ते ३६ महिने मुदतीच्या सोहम ठेव याजनेत सर्वसामान्य ठेवीदारांसाठी ८.६०% व ज्येष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी ८.८०% एवढा व्याजदर घोषित केला आहे. तसेच एकरकमी रु.६ लाख व अधिक रकमेसाठी ९.००% एवढा व्याजदर देऊ केला आहे. ठेवीदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत
च्या या विविध योजनांमध्ये मोठी गुंतवणूक करून संस्थेच्या सुरक्षित व आकर्षक परताव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.