विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर…

Spread the love

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे विनोद कांबळींना मदत जाहीर केली आहे.

ठाणे – भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे (भिवंडी) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे कांबळी यांची चौकशी केली. तसंच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती केली.

शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मदत

क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची परिस्थिती पाहता कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पुढील आठवड्यात करण्यात येणार असून येणाऱ्या काळात त्यांना अजून मदत करण्याचं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याचं ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितलं.

राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच हॉस्पिटलमध्ये भेटण्याची विनंती केली. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संवेदनशील खा. डॉ. श्रीकांत शिंदे हे क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची भेट घेऊन कांबळी परिवाराला मदत करणार आहेत.

याआधीही खालावली होती प्रकृती :

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ 10 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विनोद कांबळीला चालताना त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. चालण्यासाठी दोन व्यक्ती त्याच्या हाताला धरून मदत करत होते. आपल्या दमदार फलंदाजीनं गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या विनोदची अशी अवस्था पाहून क्रिकेट चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page