आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ ज्योतिषी सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.
▪️मेष (ARIES) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ उत्साहानं होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्रांची भेट होईल. दुपार नंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. कुटुंब, आप्तेष्ट आणि कामाच्या ठिकाणी संबंधातील सौहार्दता टिकून राहण्यासाठी स्फूर्ती आणि उत्साह ह्यात संतुलन ठेवावं लागेल.
▪️वृषभ (TAURUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. द्विधा मनःस्थितीमुळं आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.
▪️मिथुन (GEMINI) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे आणि सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपारनंतर थोडे सावध राहावं लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.
▪️कर्क (CANCER) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्यानं प्रकृतीवर परिणाम होईल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रासह एखाद्या सहलीचं नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.
▪️सिंह (LEO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. दिवसाची सुरूवात शारीरिक, मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापानं इतरांची मने दुखवाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.
▪️कन्या (VIRGO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणीवर संयम ठेवा. प्रकृती नरम गरमच राहील. दुपारनंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. विद्येची आवड निर्माण होईल.
▪️तूळ (LIBRA) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत.
▪️वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार – व्यवसायात आपण व्यस्त राहाल आणि त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण-घेवाण होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन समाधानाचं राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल.
▪️धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजच्या दिवसाची सुरूवात शारीरिक, मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपारनंतर मात्र शारीरिक, मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक लाभ झाल्यानं भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल.
▪️मकर (CAPRICORN) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्यानं शक्यतो प्रवास टाळावेत.
▪️कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्यानं कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्यानं आपलं मन दुखावलं जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळं आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणं हिताच राहील.
▪️मीन (PISCES) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक आणि व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद आणि मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणीवर संयम ठेवावा लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.
🔸️एस्ट्रो सरिता शर्मा -9310820945
🔸️वैदिक, केपी, अंकज्योतिष, मोबाइल अंकज्योतिष, ,जैमिनी, नाडी, टैरो…