मुंबई : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे.सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस (LPG Gas) सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे