रत्नागिरी: शहरानजीकच्या गावात कबड्डी खेळताना तरुण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कोल्हापूरला दाखले केले होते. त्यानंतर कोल्हापूरहून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी (ता. ७) त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. मानस यशवंत आडविलकर (२३) असे जखमी तरुण खेळाडूचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २) येथील नजीकच्या गावात कबड्डी स्पर्धा सुरु असताना घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मानस कबड्डी स्पर्धेत खेळत असताना त्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्याला उपचारासाठी कोल्हापूर व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.