रत्नागिरी: शहरातील रहाटाघर बस डेपोमध्ये मद्यच्या नशेत असलेल्या कर्मचाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू भागवत निपाणीकर (वय ४०, रा. निपाणी ता. कळंब जि. धाराशिव. सध्या रा. गुहागर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ५) दुपारी साडेचारच्या सुमारास रत्नागिरी रहाटाघर बस डेपो येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा ड्युटीवर असताना मद्य प्राशन केलेल्या स्थितीत आढळला. या प्रकरणी प्रद्युम्न शिरधनकर (वय ५५, रा. पांडवनगर, नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.