राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. मात्र आता या मागण्यांबद्दल राज्य सरकारची सकारात्मक चर्चा झाली असून काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.
राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. तसंच त्यांना मोबाईल फोन्सही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे. कर्मचारी आणि सरकारच्या सहकार्याने ही योजना सुरू होणार आहे.