मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले असले तरी राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन झालेले नाही. एकीकडे भाजप नेत्याला मुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असताना मंत्रिपदवाटपावरून घटक पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गवावरून परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, ‘मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतली. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.’
एकनाथ शिंदे काय म्हणाले?…
आमचे सरकार हे जनतेच्या आवाजाचे सरकार आहे. आमच्या सरकारने लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पीएम मोदी आणि अमित शहा घेतील. नरेंद्र मोदी आणि अमित शहा भाई काहीही म्हणतील, ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला काय मिळणार आहे, हे आमच्या हातात नाही. पण जनतेला काय मिळणार आहे, हे आमच्या हातात आहे.महाविकास आघाडीवर निशाणा साधताना कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आपला नेता निवडण्यासाठी विरोधकांनाही सोडले नाही, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे गेल्या शुक्रवारी (२९ नोव्हेंबर २०२४) त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला गेले होते. याआधी मुंबईत महाआघाडीची बैठक होणार होती, मात्र त्यात ते हजर राहिले नाहीत. दरम्यान, महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर दोन दिवसानंतर म्हणजेच १ डिसेंबर रोजी पुन्हा परतले. आता रविवारी सायंकाळपर्यंत काही मोठ्या राजकीय घडामोडी समोर येऊ शकतात. तसेच महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबतची परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे