रशिया युक्रेन संघर्ष खूपच चिघळत आहे. कारण पुतीन यांनी अण्वस्त्र वापरासंदर्भात नवीन धोरणात्मक सूतोवाच केलं आहे. यावर अभ्यासक कक्कर यांचा लेख.
अनेक महिन्यांच्या विचारमंथनानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शेवटी युक्रेनला रशियामध्ये हल्ला करण्यासाठी त्यांनी दिलेल्या लांब पल्ल्याच्या आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम्स (ATMS) वापरण्याची परवानगी दिली. सुरुवातीला कुर्स्क प्रदेशात जेथे रशियाने उत्तर कोरियाच्या सैन्यासह तैनाती वाढवली आहे, त्या भागात याचा वापर होईल. सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या दिशेने अमेरिकेच्या धोरणात हा एक लक्षणीय बदल आहे जो, बायडेन यांची कारकीर्द संपण्याच्या काही दिवस आधी झाला आहे. बायडेन यांचा हा निर्णय युक्रेनसाठी पुरेसा नसला तरी संघर्षाला नवा आयाम देणारा आहे.
अमेरिकेचे अध्यक्षपद 20 जानेवारी रोजी स्वीकारणाऱ्या ट्रम्प यांनी युक्रेनला दिलेला पाठिंबा कमी करून युद्धातील हस्तक्षेप संपवण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. त्यांच्या समर्थकांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली आहे की, ते लष्करी औद्योगिक कॉम्प्लेक्सच्या हातातलं बाहुलं आहेत आणि तिसऱ्या महायुद्धाला खतपाणी घालत आहेत. यूएस निर्बंधांमुळे यूके आणि फ्रान्ससह इतर सहयोगी देशांना त्याचं अनुसरण करण्यासाठी दरवाजे उघडतील. ब्रिटनने आधीच जाहीर केलं आहे की ते युक्रेनला त्यांच्या ‘स्टॉर्म शॅडो’ क्षेपणास्त्रांना अशाच प्रकारे वापरण्याची परवानगी देतील.
बायडेन यांच्या मान्यतेनंतर काही दिवसांनी, युद्धाच्या 1000 व्या दिवशी, युक्रेनने रशियाच्या ब्रायन्स्क प्रदेशावर क्षेपणास्त्रे डागली. तर रशियाने, सहा क्षेपणास्त्रांपैकी पाच क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे, तसंच अमेरिकेने डागलेल्या आठपैकी दोन क्षेपणास्त्रे पाडल्याचा उल्लेख केला आहे. ATMS क्षेपणास्त्रांचा पल्ला 300 किमी आहे आणि त्यांना रोखणे सोपे नाही.
अलीकडेपर्यंत, युक्रेन हा आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याविरूद्ध अमेरिकेने दिलेली शस्त्रप्रणाली स्वतःच्या भूमीवर वापरत होता. अमेरिकेने युक्रेनला खार्किव हल्ल्याला रोखण्यासाठी 80 किलोमीटरच्या HIMARS प्रणालीचा वापर करण्याची परवानगी दिली होती, जी प्रभावी ठरली.
पुतिन यांनी दोन दिवसांपूर्वी रशियाच्या आण्विक वापराच्या सिद्धांतातील बदलांना मान्यता दिली होती. कदाचित अमेरिकेकडून अशा निर्णयाची अपेक्षा होती. काही काळासाठी, रशिया नाटोला इशारा देत होता की जर त्याने युक्रेनला रशियामध्ये क्षेपणास्त्रे डागण्याची परवानगी दिली तर याचा अर्थ असा होईल की नाटो थेट रशियाविरूद्धच्या कारवाईत सामील आहे. सुधारित सिद्धांत ठळकपणे दर्शवितो की ‘अण्वस्त्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने केलेला हल्ला हा संयुक्त हल्ला मानला जाऊ शकतो. सुधारित आण्विक सिद्धांतानुसार, रशिया अण्वस्त्रांचा वापर करणाऱ्या अशा हल्ल्यांना उत्तर देऊ शकतो. ही बदललेली शिकवण आणि युक्रेनच्या हल्ल्यानंतरही अमेरिकेने स्वतःची अणु स्थिती बदलण्याचा कोणताही हेतू नसल्याचं म्हटलं आहे.
पुतिन यांनी यापूर्वी सांगितलं केलं होते की, युक्रेनमध्ये एटीएमएस क्षेपणास्त्रे स्वत: वापरण्याची क्षमता नाही. त्यांनी हेही निग्रहानं सांगितलं की, केवळ पाश्चात्य उपग्रह त्यांच्या कामासाठी गुप्तचर डेटा प्रदान करू शकतात. तसंच केवळ नाटो कर्मचारी ‘फ्लाइट मिशन नियुक्त करू शकतात’,. ते म्हणाले, ‘जर हा निर्णय (रशियाविरूद्ध एटीएमएस क्षेपणास्त्रे वापरणे) घेतला गेला तर त्याचा अर्थ (नाटोचा) थेट सहभाग कमी होणार नाही, असा इशारा रशियन प्रवक्ते आणि पुतीन सरकारचे सदस्य देत आहेत. यातून असं दिसतं की, युक्रेन तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. मात्र पाश्चात्य देशानी रशियाला हलक्यात घेत पोकळ धमकी मानून त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
अमेरिकेतील बायडेन प्रशासन रशियाच्या धमकीची चाचणीच घेत आहे. तसंच पुतीन यांच्या अणु पर्यायावर नेमकी काय कृती करतात हे जाणून घेत आहेत . युक्रेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पुतिन धमकी दिल्याप्रमाणे उत्तर देणार नाहीत, असा अमेरिकेचा विश्वास आहे. दुसरीकडे बायडेन हे ट्रम्प यांनादेखील संकेत देत आहेत की, त्यांचं सरकार जाणार असूनही त्यांच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती आहे. त्याचवेळी हे निर्णय नंतर ट्रम्प यांना निस्तरावे लागणार आहेत.
दुसरीकडे यूएस प्रशासनाला यातून आणखी एक संदेश देत आहे की त्यांचा निर्णय युद्धभूमीवर उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या प्रवेशाला विरोध म्हणून आहे. यामुळे मात्र युद्धक्षेत्रातील वातावरण बदलू शकते. तरीही अमेरिकेच्या घोषणेला उशीर झाल्यामुळे रशियाला या क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याबाहेर आपली बहुतेक मोठी लष्करी मालमत्ता हलवण्यास आधीच वेळ मिळाला आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून पुतिन यांनी युक्रेनला पाठिंबा देण्याविरुद्ध पाश्चिमात्य शक्तींना धमकावले होते. परंतु त्यांनी कधीही कारवाई केली नाही. नाटोने युक्रेनला शस्त्रे दिली आणि रशियाने मौन बाळगलं. युक्रेनने सीमा ओलांडून कुर्स्कमध्ये प्रवेश केला तेव्हाही, दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलर प्रमाणे पहिल्यांदाच पुतिन यांनी हल्ल्याची धमकी दिली, परंतु त्यांनी कृती केली नाही. यामुळे, सुधारित आण्विक सिद्धांत देखील पुतिन यांचा आणखी एक पोकळ इशारा म्हणून मानलं जात आहे.
असं दिसून येईल की पुतिन आणि बायडेन दोघंही कुर्स्कबद्दल चिंतित आहेत. कोणत्याही शांतता चर्चेपूर्वी पुतिन यांना युक्रेनियन सैन्याकडून हा प्रदेश परत मिळवायचा आहे आणि म्हणून ते अतिरिक्त सैन्य पाठवत आहेत. बायडेन यांना आशा आहे की, या मंजुरीमुळे युक्रेनला भविष्यातील कोणत्याही वाटाघाटींमध्ये हा प्रदेश राखून ठेवण्यासाठी फायदा होईल. पुतिन यांचेही स्वतःचे हितसंबंध आहेत. ते त्यांच्या अटींवर संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करतील.
पुतीन यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ट्रम्प युगाची सुरुवात. जर त्यांनी संघर्ष वाढवला, जे बायडेन त्यांना करायला लावत आहेत, तर माघार घेण्याची शक्यता कठीण आहे. त्याचबरोबर त्यांनी युक्रेनच्या ऊर्जा संसाधने आणि प्रतिष्ठानांचे लक्ष्य वाढवले आहे. हिवाळा जवळ येत असताना, युक्रेनची ऊर्जा संसाधने नष्ट केल्यानं युक्रेनियन लोकांमध्ये संताप निर्माण होईल.
ट्रम्प यांनाही निर्णयाच्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या आगमनानंतर लगेचच त्यांनी बायडन यांनी दिलेल्या मंजुरीला स्थगित द्यावी किंवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा फायदा घ्यावा लागेल. जर त्यांनी लवकर निर्णय घेतले तर ते पुतीन यांना वश करु शकतील. मात्र जर त्यांनी उशीर केला, तर यामुळे वाद सोडवण्याची संधी गमावली जाऊ शकते.
खरं तर, पुतीन यांनी पाश्चिमात्य चिथावणीला प्रत्युत्तर दिलं. त्यांनी युक्रेनच्या संरक्षण औद्योगिक संकुलावर पारंपरिक पद्धतीनं ओरेशनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र, मॅच 10 च्या वेगाने प्रवास करतं आणि कोणत्याही क्षेपणास्त्रविरोधी संरक्षणाच्या क्षमतेला भेदू शकतं. ही चाचणी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 किमी आहे आणि ते ब्रिटनसह युरोपमधील कोणत्याही लक्ष्यावर मारा करू शकते. यातून रशियन सहिष्णुतेची मर्यादा ओलांडली आहे, असा संदेश पुतिन यांनी दिला होता. आपल्या संदेशात त्यांनी इशारा दिली की हे प्रक्षेपण पश्चिमेकडून वाढलेल्या आक्रमणाचा प्रतिसाद होतं. खबरदारीचा रशियानं अमेरिकेला आगाऊ इशारा दिला. आता पाश्चिमात्य हा इशारा कसा घेतं ते पाहावं लागेल.