
*संगमेश्वर:- दिनेश अंब्रे-* संगमेश्वर मधील नावडी भंडारवाडा येथे राहणारे प्रतिष्ठित नागरिक व एसटी वाहक श्री. विनय विश्वनाथ मूरकर (सेवा सत्तावीस वर्षे पूर्ण यांचा पागाआळी येथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यांच्या आईचे नाव कै. सविता व वडील कै.विश्वनाथ मुकुंद मुरकर होय. शालेय शिक्षण पैसा फंड स्कूल येथे झाले. श्री. विनयभाई यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले. पुढे त्यांनी आठवडा बाजार व रामकुष्टे गॅस एजन्सी संगमेश्वर येथे प्रामाणिकपणे काही वर्ष सेवा केली.1995 मध्ये विवाह होऊन सुविद्य पत्नी सौ.वृशाली माहेरचे वैशाली जनार्दन पडवळ गुहागर (खालचा पाट )यांच्याबरोबर विवाहबद्ध होऊन सुखाचा संसार सुरू झाला. या कामातील आलेल्या अर्थाजनातून ते आपल्या कुटुंबाची गुजरात करीत असत. वडील मिल कामगार रिटायर्ड (1995) होते.




जिवन वेलीवर मोठा मुलगा गणेश व कनिष्ठ अमेय यांचे संगोपन व शिक्षण जबाबदारी पार पाडली. एसटीमध्ये 12 सप्टेंबर 1997 साली श्री.उदय करमरकर व श्री. राम बिवलकर व मोहन भिडे यांनी सांगून एसटी वाहक म्हणून फॉर्म भरला.माजी आमदार श्री. सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांच्या प्रयत्नाला यश मिळाले व श्री. विनयजी एसटी सेवेत वाहक म्हणून 1997 ला चिपळूण आगारात त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी आगार व्यवस्थापक श्री. देसाई, श्री.पवार, श्री.सोहनी, श्री. सुरेंद्र माने,श्री.रणजीत राजेशिर्के राजेश पाथरे, दीपक चव्हाण असे अनेक आगार प्रमुख लाभले. एसटी कामगार संघटना तत्कालीन अध्यक्ष रवी लवेकर व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.
एसटीआय काजरोळकर मॅडम, कदम साहेब, हातखंबकर मॅडम तसेच वाहतूक नियंत्रक श्री. पवार,श्री. गुजर,श्री. मोरे,श्री. केळकर श्री.गोरीवले,श्री पाथरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. श्री. पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
अकाउंट सेक्शन श्री. मनोरकर, श्री. सुशांत कदम, श्री. अमोल मोहिते,सौ. सुर्वे मॅडम श्री. चितळे सर,श्री.कारंडे सर, श्री. वाडकर यांचे आत्तापर्यंत मार्गदर्शन व जिव्हाळा लाभला.
प्रवासी वर्ग तसेच सफाई कामगार यांचे प्रेम लाभले. चालक मित्र कै. एस एस कांबळे, एस.एम.चव्हाण यांच्या सुरक्षित ड्रायव्हिंग मुळे लांब पल्याचा प्रवास सुरक्षितपणे गाठता आला व देवदर्शन ही लाभले हे श्री.मूरकर यांनी सांगितले.
चालक श्री.घाणेकर एसटी पवार, श्री.विनायक संसारे इत्यादी नेहमीचे वस्ती चालक यांचा प्रेम व जिव्हाळा लाभला.यामध्ये पत्नी सौ.वृषाली विनय मूरकर यांची सर्विस मध्ये अविरतपणे साथ लाभली.
प्रवाशांना दैवत समजून अंध, अपंग, वृद्ध यांच्याशी सामाजिक बांधिलकी जपून प्रेमळपणे वागणूक देऊन कामगिरी बजावली.
30 नोव्हेंबर 2024 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी एसटीमध्ये मानवता हाच धर्म पाळून 27 वर्ष सेवेची प्रामाणिकपणा मेहनत कष्ट चिकाटी व प्रेमळ मनमिळाऊ स्वभाव विशेषतः संगमेश्वर मध्ये एखादा चांगला कार्यक्रम असला तरी त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा, कौतुक आवर्जून करतात.
महिला सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम संगमेश्वर मध्ये झाले, त्यावेळीही त्यांनी महिलांना छान पैकी पाठिंबा दिला आणि वेळोवेळी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि आवश्यक असेल तेवढे सहकार्य करण्याचे ही त्यांनी आश्वासन दिले.
यासाठी संगमेश्वर मधील महिलांनी पागआळी येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चिता (अमृता )राहुल कोकाटे या मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,पुस्तक देऊन श्री विनयजी मुरकर यांचा सत्कार केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. वृषाली मुरकर यांनाही श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट वाहक म्हणून पुरस्कार लाभला. तसेच रोटरी क्लब चिपळूण २००२ मद्ये सुरेंद्र माने चिपळूण आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते चिपळूण डेपोतून पुरस्कार 2002 साली मिळाला.
आमसभा चिपळूण येथे श्री. आमदार सदानंद चव्हाण यांच्या शुभहस्ते 2016 साली त्यांचा सत्कार झाला.प्रवासी वर्गाकडून उत्कृष्ट कामगिरीबद्दल डी.सी.ऑफिस कडून प्रशस्ती पत्र मिळाली. सध्या पायाच्या आजारामुळे ते प्रभारी वाहतूक नियंत्रक आहेत. सामाजिक योगदान व धार्मिक, सामाजिक,अध्यात्मिक कार्यात आजपर्यंत विशेष योगदान त्यांचे लाभत आहे.त्यांची एकूण सेवा सत्तावीस वर्ष दोन महिने झाली आणि 30 नोव्हेंबर 2024 रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.