महायुती-महाविकास आघाडीची नजर अपक्ष, बंडखोरांवर:तयारी ‘सत्ता’स्थापनेची, हॉटेलच्या खोल्या, चार्टर्ड विमाने बुक…

Spread the love

मुंबई- निवडणूक निकालाबाबत एक्झिट पोलचे अंदाज काहीही आले तरी त्यावर फारसा विश्वास न ठेवता युती व आघाडीने काठावरचे बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी ‘बी प्लॅन’ची तयारी केली आहे. त्यासाठी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी २४ नोव्हेंबरला पक्षाच्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे. त्यांच्यासोबतच विजयी झालेले बंडखोर व गळाला लागणाऱ्या अपक्ष आमदारांनाही चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांची पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपने सॉफिटेल हॉटेल, उद्धवसेनेने ग्रँड हयात तर काँग्रेसने रेनिसन्स हॉटेलमधील खोल्या बुक करून ठेवल्याची माहिती आहे. अपक्ष आमदारांचे मन वळवण्यासाठी संबंधित विभागातील बड्या नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सर्वात कमी आमदार आले तरी अजित पवार, उद्धवांच्या हाती सत्तेच्या किल्ल्या…

महायुतीत अजित पवारांचा पक्ष तर आघाडीत उद्धवसेनेचे सर्वात कमी आमदार विजयी होतील. तरी या दोघांच्याच हाती सत्तेच्या चाव्या असतील.

उद्धव व अजित या दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आहे. जर अजित यांचे २० ते २५ च्या दरम्यान आमदार निवडून आले व मविआला सत्तेसाठी तेवढ्याच आमदारांची गरज पडत असेल तर मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या अटीवर अजित ‘घरवापसी’ करू शकतात. मविआला काठावरचे बहुमत मिळाले तर २०१९ प्रमाणे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीची अडवणूक करू शकतात.


शिवसेना फुटीचा अनुभव पाहता काँग्रेस परराज्यात नेणार आमदार

२०२२ मध्ये भाजपने शिवसेनेचे आमदार फोडून त्यांना गुवाहाटीत नेले व राज्यात सत्तांतर घडवले. उद्या काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर तसा धोका होऊ नये म्हणून पक्षाने काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात विशेष विमानाने आमदारांना नेण्याची तयारी केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page