आपलं पाप लपवण्यासाठी भाजपनं रचलं ‘बिटकॉइन घोटाळ्या’चं कुभांड; काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप…

Spread the love

तथाकथित बीटकॉईन घोटाळ्यात नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला होता. यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उत्तर दिले आहे.

भाजपकडून ‘बिटकॉइन घोटाळ्या’चे कुभांड रचण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आवाज नसलेली ऑडिओ क्लिप तयार करण्यात आल्याचे लोंढे म्हणाले.

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला होता. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन भाजचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी होते. यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अतुल लोंढे म्हणाले, राज्यभरात विविध भागामध्ये भाजपच्या नेत्यांकडून भ्रष्टाचारात कमावलेले पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. विनोद तावडे यांना पैसे वाटताना लोकांनी रंगेहाथ पकडले, नाशिक येथे सत्ताधारी पक्षाची मोठी रक्कम सापडली, वर्धा येथे भाजपची दारु पकडली आहे. या सर्व गोष्टींवरून लक्ष वळविण्यासाठी रविंद्रनाथ पाटील नावाच्या एका भामट्याला आयपीएस अधिकारी असल्याचे दाखवून मतदानाच्या अगोदरच्या दिवशी रात्री उशीरा भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला.

लोंढे म्हणाले, भाजपाने ज्या व्यक्तीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून पुढे केले, तो रविंद्रनाथ पाटील आयपीएस ॲाफिसर कधीही नव्हता. त्याने ट्रेनिंग देखील पूर्ण केले नव्हते. त्यामुळे त्याला हकलून दिले होते. बिटकॅाईनच्या घोटाळ्यात हा व्यक्ती जेलमध्ये होता. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांसह या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहे याची आमच्याकडे माहिती आहे.

क्लीपमधील आवाज नाना पटोलेंचा नाही…

लोंढे म्हणाले, भाजपने दाखवलेल्या क्लीपमधील आवाज नाना पटोलेंचा नाहीच. भाजपच्या या बनावटगिरीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. सचिन वाझे, रविंद्र नाथ पाटील यांसारख्या आरोपी, गुन्हेगारांना पुढे करून, त्यांना ब्लॅकमेल करून कट कारस्थाने रचून भाजप आपली पापेही झाकू शकणार नाही आणि पराभवही टाळू शकणार नाही, असेही लोंढे यांनी म्हटलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page