देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी:पावसात सभा झाल्यावर निवडून येतात, असे नेते म्हणतात; फडणवीसांचा पवारांना टोला…

Spread the love

शिरोळ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शिरोळ येथे सभा पार पडली. सभा सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी पावसात भिजत भाषण केले. पावसात भिजलो की जागा निवडून येते, असे नेते म्हणतात, असा टोला फडणवीसांनी शरद पवारांना लगावला. आता मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे म्हणत शिरोळ मतदारसंघासाठी पैशांची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पावसात सभा झाली की निवडून येतात…

सत्यजित देशमुख यांची सीट निवडून येणे पक्के आहे. कारण मी पावसात सभा घेतोय. पावसात सभा घेतली की, सीटा निवडून येतात. हा शुभ् संकेत आहे. पावसात सभा झाल्या की, निवडून येतात, असे नेत्यांचे म्हणणे आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला. पुढे ते म्हणाले, पाऊस पडो अथवा ना पडो पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

वाकुर्डीच्या योजनेला निधी कमी पडू देणार नाही…

वाकुर्डी बुद्रुकची योजना 1999 ते 2014 कुलूपबंद होती. जयंतराव पाटील अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री होते, पण फुटकी कौडी दिली नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एका झटक्यात 100 कोटी रुपये दिले. या योजनेच्या निमित्तोन महाराष्ट्राचा निर्णय घेतला. आता ओपन कॅनॉल नाही तर बंदीस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल, असे मी सांगितले. पहिला टप्पा संपत आहे, दुसरा टप्पाही आता मंजूर आहे. सत्यजित देशमुख निवडून आल्यास, वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होईपर्यंत पैशांची कमतरता पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 45 हजार एकर जमीन आपल्याला पाण्याखाली आणायची आहे. या 26 योजना करण्याचे पूर्ण करण्याचे वचन देवाभाऊ तुम्हाला देतोय, असेही ते म्हणालेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर मार्चच्या बजेटमध्ये बार उडवून देतो आणि या सगळ्या योजनांचे काम करतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पुढील वेळी मते मागायला येऊ तेव्हा एकही मागणी शिल्लक ठेवणार नाही..

शिरोळसाठी सगळ्या मागण्या पूर्ण करून दाखवू. पाच वर्षांनी पुन्हा मते येऊ तेव्हा त्यातील एकही मागणी शिल्लक नसेल हे वचन देण्यासाठी मी आलो आहे. आमचे सरकार सामान्य माणसाचे सरकार आहे, असे फडणवीस म्हणालेत.

मोदी-शहांनी शेतकऱ्यांवरील 10 हजार कोटींचा टॅक्स रद्द केला..

15 वर्षे ऊसाचा कारखाना आणि शेतकऱ्यावर इनकम टॅक्सची तलवार लटकली होती. शेतकऱ्यांवर इनकम टॅक्सची तलवार लावू नका अशी मागणी घेऊन पवार साहेब मनमोहन सिंग यांच्याकडे गेले होते, पण हात हालवत परत यायचे. आमचे सरकार आल्यानंतर एका झटक्यात शेतकऱ्यांवरील 10 हजार कोटींचा इनकम टॅक्स मोदी आणि अमित शहांनी रद्द केला, असा दावाही फडणवीस यांनी केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page