राजापूर / प्रतिनिधी – राजापूर विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत श्री संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव यांना अखिल भारतीय हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, संजय यादवराव यांच्या मागील पंचवीस वर्ष सामाजिक कार्याची दखल घेत हा पाठिंबा जाहीर केला आहे.
“संजय यादवराव हे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. समाजहिताचे विचार असणारे नेते आहेत. कोकणातील रिकामी होणारे गाव बंद होणाऱ्या शाळा , वर्षानुवर्ष कोकणातील तरुणांचे मुंबई-पुण्यात होणारे स्थलांतर हे सर्व थांबण्यासाठी गावागावात उद्योग आणि व्यवसाय निर्माण व्हायला हवेत यासाठी संजय यादवराव एकमोठे अभियान चालवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मूलभूत विकास होण्यास चालना मिळेल. त्यांच्या कामात प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना दिसते, ज्यामुळे ते जनतेसाठी आदर्श नेता ठरू शकतात.” अशी आशा हिंदु महासभेने व्यक्त करत आपल्या पक्षाचा पाठींबा संजय यादवराव याना जाहीर केला आहे .
या पाठिंब्यामुळे राजकीय वातावरणात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. मतदारांमध्येही या निर्णयाची चर्चा आहे, आणि संजय यादवराव यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे ओळखले जाते. कोकणातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायिक यांच्या समस्या विधानसभेत मांडण्यासाठी अभ्यास नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून त्यांना या निवडणुकीत संजय यादवराव विजयी करावे असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे. महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशच्या पाठिंब्यामुळे त्यांना अधिक व्यापक समर्थन मिळेल, अशी अपेक्षा आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेमुळे हिंदुत्ववादी व सनातनी मतदारांचा मोठा पाठिंबा संजय यादवरावांना मिळत आहे
या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून, संजय यादवराव यांना निवडणुकीत प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. श्री संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव यांची निशाणी फणस आहे. फणस या निशाणी समोरील ८ नंबरवर बटन दाबून श्री संजय आत्माराम यादव उर्फ यादवराव यांना विजयी करा. फणस ही कोकणातील समृध्दीची आणि परिवर्तनाची निशाणी आहे. या निवडणुकीमध्ये कोकणातील पहिले मोठे परिवर्तन राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये होईल असा विश्वास हिंदु महासभेने व्यक्त केला असल्याची माहिती संदीप शिरधनकर सरचिटणीस, शिवस्वराज्य कोकण संघटना यानी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .